Marathi News
Maharashtra Times, Sunday May 11, 2008
पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणा - या शेतक - यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात आपण विचार करू असं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज म्हटलय. नवी दिल्ली इथं राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते...

Saturday May 10, 2008
सातारा, ता. ९ - शिक्षण आणि संस्थेच्या विस्ताराची भूमिका घेताना त्यास गुणात्मकतेची जोड दिली पाहिजे. यासाठी सर्वांनी आत्मचिंतन केले पाहिजे; अन्यथा समस्या वाढतील, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले...

Friday May 9, 2008
पुणे, ता. ८ - ""यंदा गहू आयात करावा लागणार नाही. गहू, तांदळासह अन्नधान्याचा देशात पुरेसा साठा असून, त्याचा वापर भाववाढ कमी करण्यासाठी करण्यात येणार आहे,'' असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले...

Thursday May 8, 2008
पुणे - महागाई नियंत्रणात आणण्याची शक्ती आता केंद्र सरकारमध्ये आली आहे, असे ग्वाही केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली...

Sunday April 27, 2008
श्रीरामपूर, ता. २६ - ""पाश्चिमात्य देशांतील विद्यार्थी शास्त्र विभागात संशोधन करून पेटंट मिळवितात; मात्र आपल्या विद्यापीठांत अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्याने पेटंट मिळविले नाही...

Monday April 14, 2008
नागपूर, ता. १३ - पाच एकरांच्यावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे ठराविक रकमेचे कर्ज माफ करण्याचा विचार सुरू असून, याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे दिली...

Tuesday April 8, 2008
चंडीगड, ता. ७ - ""देशात अन्नधान्याची टंचाई भासल्यास गव्हासह अन्य वस्तूंची आयात करण्यास सरकार कचरणार नाही,'' अशी ग्वाही कृषिमंत्री शरद पवार यांनी आज दिली. आयातीचा निर्णय खरीप हंगामाच्या अखेरीस घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले...

Monday April 7, 2008
बारामती, ता. ६ - येथील विद्यार्थ्यांना येत्या ऑगस्ट महिन्यापासून जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. केंब्रिज स्कॉलरशिप सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य अरविंद पारिख, सुधीर देशपांडे व जीनी मदान यांनी आज विद्या प्रतिष्ठान संकुलास भेट देऊन या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली...

Saturday March 29, 2008
बारामती, ता. २८ - ""कर्जमाफीच्या निर्णयामुळे सर्व बॅंकांची कोट्यवधी रुपयांची वसुली एक दिवसात झालेली आहे. बॅंकांचे काम सरकारने सोपे केले असल्याने, आता शेतकरी व महिला बचत गटासारख्या घटकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजात बॅंकांनीही कपात करायला हवी,'' अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे व्यक्त केली...

Saturday March 29, 2008
पुणे, ता. २८ - भारत हा कृषिप्रधान देश असून, त्यापैकी ८१ टक्के शेतकऱ्यांची जमीन ही जिरायत आहे व ती पाच एकरांच्या आत आहे.
केवळ जिरायत शेतीवर कुटुंब चालविणे अवघड असून, बॅंकांनी अशा शेतकऱ्यांना पूरक व्यवसायासाठी कमी दराने अर्थसाह्य केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत होऊ शकेल, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केले...

Saturday March 29, 2008
बारामती, ता. २८ - ""शेतकऱ्यांचे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करूनही मी समाधानी नाही. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात, त्यांच्या व्याजात तीन ते चार टक्के कपात व्हायला हवी. कर्जमाफीसाठी पाच एकर क्षेत्राचा निकष ठरविला आहे. तथापि, जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हे प्रमाण बदलण्याची गरज आहे...

Thursday March 20, 2008
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १९ - साखर विकास निधीतून साखर कारखान्यांना दिला जाणारा निधी ऊस उत्पादकांची रक्कम देण्यासाठीच असेल व कारखान्यांनी १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे अदा केले नाहीत तर १४ टक्के व्याजासह शेतकऱ्यांचे देणे द्यावे लागेल, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत स्पष्ट केले...

Thursday March 13, 2008
मुंबई, ता. १२ - "ग्लोबल वॉर्मिंग'मुळे बदलत असलेल्या हवामानात तग धरू शकतील अशा पिकांचे वाण शोधण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे केले...

Friday March 7, 2008
नवी दिल्ली, ता. ६ - "ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिरंगी स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक यश संपादन केल्यामुळे तरुण खेळाडूंना संधी देण्याचे आमचे धोरण यशस्वी ठरल्याचे सिद्ध होते...

Thursday March 6, 2008
नवी दिल्ली, ता. ५ - दक्षिण आशियातील देशांनी विभागातील एकमेकांतील व्यापार वाढविण्यावर भर द्यावा आणि "साफ्टा'ला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले...

Saturday February 23, 2008
शिलॉंग, ता. २२ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे आपण क्रिकेट प्रशासनाच्या कारभारात लक्ष घालत नसल्याचे सांगताना त्यासाठी तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती केली असल्याचे सांगितले...

Thursday February 7, 2008
नवी दिल्ली, ता. ६ - राष्ट्रीय कृषि विकास योजनेतील प्रकल्पांच्या आखणी आणि अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने राज्यांना आतापर्यंत सुमारे ९२९ कोटी रुपये मंजूर केले आहेत...

Tuesday February 5, 2008
नवी दिल्ली, ता. ४ - ""देशातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी मे २००७ मध्ये गहू आयातीची एक निविदा रद्द करण्यात आली,'' असे कृषिमंत्री शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी गहू आयात प्रकरणी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यातील आक्षेप पवार यांनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत खोडून काढले...

Sunday February 3, 2008
पुणे, ता.२ - ""समाजातील दुर्लक्षित घटकातील मुलांचे पुनर्वसन करून त्यांना संधी देणे गरजेचे आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांना उजाळा देणाऱ्या संस्थांना आपल्यातील प्रत्येकाने मदतीचा हात दिला पाहिजे. कुटुंबाचा आधार नाही अशा मुलांना सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा देण्यासाठी आपला समाज अजूनही दुर्लक्षितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देण्यास सकारात्मक नाही...

Sunday February 3, 2008
नवी दिल्ली, ता. २ - ""अणुकराराचे महत्त्व आघाडीतील घटक पक्षांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सरकारने करावा. तरीही त्याला कोणी विरोध करत असेल, तर तो कोणावरही लादण्याचा प्रयत्न करू नये. देशाला सध्या स्थैर्याची गरज असल्यामुळे सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केले...

Saturday February 2, 2008
खडकवासला, ता. १ - शिवणे येथील विष्णू-मालती औद्योगिक क्षेत्राकडे जाणारा रस्ता खुला करण्याचे आदेश केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला दिले आहेत.
याबाबतचा पुढील निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असा अँटनी यांचा एसएमएस केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळास वाचून दाखविला...

Saturday January 19, 2008
नवी दिल्ली, ता. १८ - कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकार लवकरच एक पॅकेज जाहीर करेल, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी आज जाहीर केले...

Wednesday January 2, 2008
नगर, ता. १ - आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका मतदारसंघांच्या फेररचनेनुसारच होतील. त्यासाठी आवश्यक तेथे जागा वाटपात बदलही होऊ शकतील, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिले...

Maharashtra Times, Monday December 31, 2007

Lokmat, Monday December 31, 2007

Sakal, Thursday December 13, 2007
पुणे, ता. १२ - देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटून व दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त बारामती होस्टेलला आज आनंदमेळ्याचे स्वरूप आले होते...

Sakal, Thursday December 13, 2007
पुणे, ता. १२ - ""सर्व कुटुंबाने शिक्षण घेतले पाहिजे, ज्या क्षेत्रात असाल, त्यामध्ये नावलौकिक मिळविला पाहिजे, त्याच वेळी सामाजिक भान ठेवून उपेक्षितांचा उद्धार करण्यासाठी झटले पाहिजे, ही शिकवण आईने दिली. त्याचे आपल्यावर मोठे ऋण आहे,'' अशा भावना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज व्यक्त केल्या...

Sakal, Wednesday December 12, 2007
बारामती, ता. ११ - "शिक्षण, पायाभूत सुविधा यांसह सर्वच बाबतींत बारामतीचा विकास करण्यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जी दृष्टी दाखविली आहे, ती देशातील सर्व आमदार, खासदारांनी दाखविली तर लोक निश्चित त्यांना दुवा देतील,' या शब्दांत रामदेव महाराजांनी श्री...

